मी करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
जि प उच्च प्राथ शाळा सुबई
ता -राजुरा जि- चंद्रपूर
*शिक्षण गीत--सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं*
*✒ शब्द रचना - श्री.विनोद गादेकर, (शिक्षक)जि.प. उस्मानाबाद.*Mob- 9404511015
mail- gvinod80@gmail.com
----------------------------------------------
*🎤 गायन with Music - करुणा गावंडे, चंद्रपूर.* mail- karunagawande@gmail.com
----------------------------------------------
*सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं*
[सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं
धडं,कविता वाची, गणितं सोडवीतं ]2 ॥धृ॥
(सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं) 1
[झेडपीच्या शाळेमंदी, गुरुजी गाती गाणी
बाई ही शिकविती , मोजाया नोटा नाणी] 2
(हसत डुलत , पोरगं भात खातं) 1
(धडं,कविता वाची, गणितं सोडवीतं) 1 ॥१॥
(सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं) 1
(घरात एक, लाडाची लेक ,
शिकन माझी चिमणी गं) 1
[कावळा,चिमणाराया ,कोकिळा गाणी गाई
फळा-फुलांची बाग , शाळेत माज्या हाई] 2
(वाटेनं शाळेच्या , धावत मन जातं,
धडं,कविता वाची, गणितं सोडवीतं) 1 ॥२॥
(सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं) 1
(घडणं , शिकणं,
विकास माझ्या देशाचा) 1
[शिकली मैना,पांडू, गरिबीचं झालं सोनं
ताटात नव्हती भाकर,हातात आला फोन] 2
(विनोद लिहितो, करुणाचं मन गातं
धडं,कविता वाची, गणितं सोडवीतं) 1 ॥३॥
[सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं
धडं,कविता वाची, गणितं सोडवीतं ]
(सरकारी शाळेमंदी,गरिबाचं पोर जातं) 1
--श्री .विनोद गादेकर ,जि.प.प्रा.शा. साठे नगर ,वाशी,जि. उस्मानाबाद. Mob. 9404511015
No comments:
Post a Comment