वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Monday, 6 August 2018

Viva video वर व्हिडीओ निर्मिती


▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
▶ आपल्या कडे viva video app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या 


▶Viva video ओपन करा
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल


▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील


▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा


▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .


▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे


▶ सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल


▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील


▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल


▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो 


▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा


▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा


▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा


▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .


▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा


▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा


▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा


▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते


▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का


▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .


▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा


▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल
▶ Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूण.आहे 


▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा


▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा


▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल


▶ नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल


▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा kruti करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल


▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा


▶[ Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .


▶ तो vdo draft मधे सेव करा


▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .नंतर शेअर करा


संकलन
करूणा गावंडे,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा,चंद्रपूर

 


3 comments:

  1. Mam.. good morning
    You are doing such a great job for us .
    I listen si much songs in your voice.
    This blog is a great contribution in making good teachers. By many blessings god may give you very long and healthy life..

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती

    ReplyDelete