वर्णनात्मक नोंदी
- माझे शैक्षणिक कार्य
- केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय शिक्षण परिषद
- स्वनिर्मित शैक्षणिक कविता mp3
- स्वनिर्मित शैक्षणिक विडीओज
- स्वनिर्मित पी.डी.एफ.
- तंत्रज्ञान कार्यशाळा
- माझे उपक्रम
- माझ्या आवाजातील गीते
- सन्माननीय अधिकारी
- माझे लेखन साहित्य
- सूत्रसंचालन
- सुविचार संग्रह
- सामान्य ज्ञान
- इंग्रजी व्याकरण
- मराठी व्याकरण
- माझा आवाजातील कविता
- तंत्रस्नेही ब्लॉग मध्ये तंत्रस्नेही ब्लॉग
- कराओके ट्रॅक
- चारोळी
- ऑनलाईन टेस्ट
- शाळेतील महत्वाच्या रेकार्ड फाईल्स
- मनोरंजक खेळ
- शाळा सिद्धी
- गुगल फॉर्म तयार करणे
- माझे अधिकारी
- माझा वर्ग,माझे उपक्रम
- जागतिक महिला दिन
- माझे वाचनालय
- मराठी बालकोश-कथा /कविता अडिओ व व्हिडीओ
- इयत्ता ७ वी कविता मराठी ,इंग्रजी व हिंदी
- इयता 6 वी कविता मराठी इंगजी हिंदी
माझे शैक्षणिक कार्य
माझे गायन
माझे सामाजिक कार्य
Friday, 26 May 2023
सर्वनाम व त्याचे प्रकार
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार.Sarvanam V Tyache Prakar.
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार.Sarvanam V Tyache Prakar.
सर्वनाम :- नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणार्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात किंवा नामाऐवजी वापरल्या जाणार्या शब्दाला ‘सर्वनाम’असे म्हणतात.
जसे :- मी,तो,ती,ते,त्यांनी,त्यांना,आम्हाला,तुम्हाला इत्यादी
सर्वनामाचे प्रकार
सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात.
(1)पुरुषवाचक सर्वनाम
(2)दर्शक सर्वनाम
(3) संबंधी सर्वनाम
(4)प्रश्नार्थक सर्वनाम
(5)सामान्य अथवा अनिश्चित सर्वनाम
(6)आत्मवाचाक सर्वनाम
(1)पुरुषवाचक सर्वनाम :- जे सर्वनाम प्रथम पुरुषी ,द्वितीय पुरुषी,तृतीय पुरुषीचे दिग्दर्शन करते त्याला ‘पुरुषवाचक सर्वनाम’असे म्हणतात.प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत फक्त तृतीय पुरुषी सर्वनामे मात्र बदलतात.
उदा.मी,तो,ते,तू,तो,तुम्ही,आम्ही,त्या,ती इत्यादी
जगात बोलणारा,ऐकणारा व ज्याच्याविषयी बोलण्यात येते तो तिसरा असे तिघेच असतात. म्हणून भाषणातही तीन पुरुष असतात.
(अ).प्रथम पुरुषवाचक :- मी,आम्ही,स्वत:,आपण
उदा.(1) मी उद्या गावाला जाणार आहे.(2)आम्ही तुला मदत करु.
(आ).द्वितीय पुरुषवाचक :- तू ,तुम्ही,स्वत:,आपण
उदा.(1) तुम्ही एवढे काम कराच.(2)आपण आत या .
(इ).तृतीय पुरुषवाचक :-तो,ती,ते,त्या,हा,ही,हे,ह्या इत्यादी
उदा. (1)ती अतिशय सुंदर होती.(2)तो आजारी होता.
(2) दर्शक सर्वनाम :-अगोदर माहीत असलेली जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरण्यात येते त्यास ‘दर्शक सर्वनाम’असे म्हणतात.दर्शक सर्वनाम होण्यासाठी (हा,ही,हे,तो,ती,ते)कर्ता म्हणून वापरावे लागतात.
उदा.हा,ही,हे,तो,ती,ते
(1) ही कोण आहे.
(2)ती चलाख आहे.
(3)हा रानटी हत्ती आहे.
जवळच्या वस्तूबद्दल हा,ही,हे वापरले जातात तर लांबच्या वस्तूबद्दल तो,ती,ते वापरतात.
(3) संबंधी सर्वनाम :-वाक्यामध्ये दोन गोष्टीमधील संबंध स्पष्ट करणार्या सर्वनामाला ‘संबंधी सर्वनाम’असे म्हणतात.संबंधी सर्वनामांना अनुसंबंधी सर्वनामे असे सुद्धा म्हणतात.
उदा.जो,जी,जे,ज्या
(1)जो चढतो,तोच पडतो .
(2)जे चकाकते ,ते सोने नसते.
(3)जो करेल,तो भरेल.
(4)प्रश्नार्थक सर्वनाम :- ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना ‘प्रश्नार्थक सर्वनामे’ असे म्हणतात किंवा एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला ‘प्रश्नार्थक सर्वनाम’ असे म्हणतात.
उदा.कोण,काय,कित्येक,कोणास,कोणाला,कोणी इत्यादी
(1) तुला काय पाहिजे ?
(2)कोणी रामायण लिहिले ?
(5)सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम :-वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले हे जेव्हा निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यास ‘अनिश्चित सर्वनाम’ असे म्हणतात.
उदा.(1) कोणी ,कोणास काय म्हणावे !
(2)हल्ली कोण कोणाला विचारत नाही.
(3)माझ्या मुठीत काय ते सांग पाहू !
(4) कोणी कोणास हसू नये.
(6)आत्मवाचक सर्वनाम :- स्वतःविषयी उल्लेख करण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्वनामाला ‘आत्मवाचक सर्वनाम’ असे म्हणतात.
उदा. (1)मी स्वत: त्याला पहिले.
(2)आपण खेळायला जाऊ.
वरील वाक्यात स्वत:,आपण ही दोन्ही आत्मवाचक सर्वनामे आहेत.
नाम व नामाचे प्रकार
नाम व नामाचे प्रकार.Noun And Its Types.
नाम व नामाचे प्रकार.Noun And Its Types.
नाम :- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.
उदा. गाडी,पेन,टेबल,राग,सौंदर्य,साखर इत्यादी
नामाचे प्रकार
मराठीत नामाचे मुख्य ३ प्रकार पडतात.
१. सामान्यनाम
२. विशेषनाम
३. भाववाचक नाम
१. सामान्यनाम :-एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाम दिले जाते त्यास 'सामान्यनाम' असे म्हणतात.सामान्यनामाचे अनेकवचन होते.
उदा.शाळा,पाणी,ग्रह,तारा,माणूस इत्यादी
सामान्यनामाचे खालील दोन प्रकार पडतात.
अ.पदार्थवाचक नाम ब.समूहवाचक नाम
अ.पदार्थवाचक नाम:-जे घटक शक्यतो लिटर,मीटर किंवा कि. ग्रॅममध्ये मोजले जातात/संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला 'पदार्थवाचक नामे' असे म्हणतात.
उदा.सोने,कापड,मीठ,पाणी,प्लास्टिक,तांबे इत्यादी
ब.समूहवाचक नाम :- समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला'समूहवाचक नाम'असे म्हणतात.
उदा.ढिगारा,जुडी,गंज,मोळी इत्यादी
२. विशेषनाम :- ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा,वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास'विशेषनाम'असे म्हणतात.
विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते.
उदा. आशा,दिल्ली,गोदावरी,भारत,सूर्य इत्यादी
३. भाववाचक नाम :- ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण,धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला'भाववाचक नाम' असे म्हणतात.
उदा. आनंद,सौंदर्य,गुलामगिरी,विश्रांती,श्रीमंती,इत्यादी
भाववाचक नामाचे तीन गट पडतात.
अ.स्थितीदर्शक - जसे-गरिबी,हुशारी
ब. गुणदर्शक - जसे-सौंदर्य,प्रामाणिकपणा
क. कृतिदर्शक - जसे-चोरी,चळवळ
Friday, 24 March 2023
द्वितीय आकारिक मूल्यमापन-कला,कार्या, शा. शी
द्वितीय सत्रातील कला ,कार्यानुभव व शारीरिक शिक्षण यांच्या तंत्रनिहाय प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी खालील Online ला क्लीक करा.
संकलन
करूणा गावंडे, जांभुळकर
राजुरा ,चंद्रपूर
द्वितीय संकलित मूल्यमापन 2023
इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व विषयाच्या नमुना प्रश्नपत्रिका (सेमी इंग्रजी सह) डाउनलोड करण्यासाठी खालील Download ला क्लिक करा.
संकलन
करुणा गावंडे, जांभुळकर
विषय शिक्षिका
राजुरा चंद्रपूर
Sunday, 26 February 2023
मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध माहिती पाहण्यासाठी खालील online ला क्लिक करा..
मराठी भाषा दिन इतिहास
मराठी भाषा दिन संपूर्ण माहिती
मराठी भाषा दिन घोषवाक्ये
मराठी भाषा दिन रांगोळी
मराठी भाषा दिन फलक लेखन
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
*'र ' ची करामत( ' र ' ची साखळी)*
(१)पाण्यात राहणारे प्राणी -- जलचर
(२)लिहिता , वाचता येणारा-- साक्षर
(३)लिहिता - वाचता न येणारा - निरक्षर
(४)बातमी आणून देणारा -- वार्ताहर
(४)वनात राहणारे प्राणी -- वनचर
(५)जमिनीवर राहणारे -- भूचर
(६)धान्य साठवण्याची जागा -- कोठार
(७)जमिनीखालून गेलेला रस्ता -- भुयार
(८)कथा(गोष्ट ) लिहिणारा -- कथाकार
(९)दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार
(१०)जादूचे खेळ करून दाखवणारा -- जादूगार
(११)नाटक लिहिणारा -- नाटककार
(१२)चित्रे काढणारा -- चित्रकार
(१३)खूप दानधर्म करणारा -- दानशूर
(१४)शत्रूला सामील झालेला -- फितूर
(१५)शत्रूकडील बातम्या काढणारा -- हेर
(१६)भारताचा राष्ट्रीय पक्षी -- मोर
(१७ )एक पाळीव प्राणी -- मांजर
(१८)पाण्यातील एक प्राणी -- मगर
(१९)झाडावर सरसर चढणारा प्राणी -- खार
(२०)सरपटणारा एक प्राणी -- अजगर
(२१)मसाल्याचा एक पदार्थ -- केशर
(२२)मोराची मादी -- लांडोर
(२३)मीठ तयार करतात ते ठिकाण - मिठागर
(२४)लोखंडी वस्तू तयार करणारा - लोहार
(२५)सोन्या -चांदीचे दागिने बनवणारा - सोनार
(२६)मातीची मडकी बनवणारा -- कुंभार
(२७)आजारी लोकांना औषधे देणारा - डाॅक्टर
(२८)लाकडी वस्तू तयार करणारा -- सुतार
(२९)चामड्याच्या चपला बनवणारा - चांभार
(३०)केळ्यांचा (घड) समूह -- लोंगर
(३१)महाराष्ट्राची उपराजधानी - नागपूर
(३२)एक कडधान्य -- मसूर
(३३)एक बी असणारे एक फळ -- बोर
(३४)एक शेंग भाजी -- गवार
(३५)या वनस्पतीपासून कात काढतात -- खैर
(३६)हातमागावर कापड विणणारा -- विणकर
(३७)एक गोड पदार्थ -- साखर
(३८)खा-या पाण्याचा मोठा साठा -- महासागर
(३९)लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक - मीटर
(४०)पाण्याचा एक स्त्रोत -- विहीर
=======================
संकलन
करूणा गावंडे, जांभुळकर
विषय शिक्षिका आर्वी
राजुरा,चंद्रपूर
Tuesday, 24 January 2023
भारतीय संविधानाचा अर्थ
*भारतीय संविधानाची प्रास्ताविका* *मधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेवूया अगदी सहज सोप्या भाषेत, तसेच संविधान प्रास्ताविक किती महत्त्वाची आहे हे समजून घेवून प्रसार करु या*
*****************************
🔅 *आम्ही*-
स्वातंत्र्यापुर्वी आपण एकत्र नव्हतो. विखुरलेले होतो. संविधानाने "मी" ला "आम्ही" केले.
🔅 *भारताचे लोक* -
विविध वतने, राजांची स्वतंत्र राज्ये, वेगवेगळे व आपापले भूभागाचे लोक एकमेकांना एकाच देशाचे समजत नसत. यांना संविधानाने एका देशाचे /भारताचे नागरिक/लोक म्हंटले.
🔅 *सार्वभौम*-
आपण आपल्या देशात आपल्याला योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत.
🔅 *समाजवादी* -
आमच्या देशात गरिब आणि श्रीमंत यांच्यात मोठी दरी असणार नाही. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असेल. संपत्तीचे काही मोजक्या लोकांच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
🔅 *धर्मनिरपेक्ष* -
विविध धर्माचे लोक असणारा देश चालवताना मात्र शासनातील व्यक्तींना काम करताना कोणताही धर्म असता कामा नये. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जाणार नाही. धर्म हा व्यक्तिपुरता असावा. तो रस्त्यावर आणु नये.
🔅 *लोकशाही गणराज्य* - लोकांकडून / मतदानाद्वारे निवडलेला प्रतिनिधी या राष्ट्राचे काम पाहील. लोकांच्या मतालाच प्रचंड किंमत असेल. लोक ठरवतील त्यांचीच टीम लोकांचे भले करणारे काम करण्यासाठी निवडली जाईल.
🔅 *घडवण्याचा* -
वरीलप्रमाणे असणारा असा देश निर्माण करण्याचा
🔅 *सामाजिक न्याय* -
व्यक्तींमध्ये जात धर्म वंश भाषा प्रदेश जन्मस्थान किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच असेल. अस्पृश्यतेसारखी, बिहिष्कृत करण्यासारखी परिस्थिती निर्माण न होऊ देणारा.
🔅 *आर्थिक न्याय* -
कोणाही एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतन, मुल्ये दिले जाईल. देशातील प्रत्येकाला कोणत्याही भेदभावाशिवाय आपल्या आवडीप्रमाणे उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क असेल.
🔅 *राजनैतिक न्याय* -
लोकशाही प्रक्रियेत महिला, पुरुष व अन्यलिंगीय व्यक्तींना व प्रत्येक घटकास निवडणूक प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवता येईल व त्याला त्याचे मत देण्याचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार असणारा.
🔅 *विचार* स्वातंत्र्य -
देशाच्या नागरिकास स्वतंत्रपणे विचार करण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यावर कोणाचाही अंकुश असणार नाही.
🔅 *अभिव्यक्ती* स्वातंत्र्य -
प्रत्येकास आपला विचार मांडण्याची मुभा असेल. विचार मांडताना व्यक्तिद्वेषी विचार नसतील तर त्यावर कोणाचेही बंधन नसेल. लिहिणे, बोलणे, सादर करणे याचे स्वातंत्र्य असेल.
🔅 विश्वास, स्वातंत्र्य -
प्रत्येकास आपण मानत असलेल्या मूल्यानुसार विश्वास ठेवण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यावर कोणाचे बंधन नसेल.
🔅 श्रध्दा व उपासना* स्वातंत्र्य -
प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्मावर श्रध्दा ठेऊ शकतो व व त्यानुसार उपासना करू शकते. धर्मांतर करणे, धर्म स्वीकारणे वा नाकारण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीस असणार आहे.
🔅 दर्जाची समानता-
प्रत्येकास समान वागणूक दिली जाईल याची खात्री. त्याचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था.
कोणासही आपला दर्जा उंचावण्याचा अधिकार असेल. आर्थिक सामाजिक व इतर प्रकारचा दर्जा उंचावताना त्या व्यक्तीस कोणीही आडकाठी करणार नाही.
🔅 संधीची* समानता-
प्रत्येक नागरिकास समान संधी व समान काम मिळेल याचे नियोजन असेल. कोणत्याही कारणाने कोणास संधीच उपलब्ध होणार नाही अशी स्थिती राहणार नाही. लोकांना आपली प्रगती साधता येईल.
🔅 व्यक्तीची प्रतिष्ठा -
नागरिकांना आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवता येईल असे वातावरण निर्माण केले जाईल. कोणाच्याही प्रतिष्ठेस ठेच लागणार नाही याची आपण काळजी घेऊ.
🔅 राष्ट्राची एकता -
राज्य, भाषा, वेश तसेच राज्यांचे सीमावाद सामंज्यसाने निकाली काढून देशांतर्गत फूट निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
🔅 राष्ट्राची एकात्मता -
विविधतेने नटलेले राष्ट्र एकात्म रहायला हवे. आम्ही एकमेकांमध्ये इतके मिसळून जावे की एकापेक्षा दुसरा वेगळा आहे असे चित्रही न दिसावे. असे आश्वासन मिळावे.
🔅 बंधुता -
देशातील नागरिकांनी एकमेकांशी वागताना बंधुत्व भावनेने वागावे. जगावे. प्रत्येक व्यक्ती आपलाच आहे ही भावना निर्माण व्हावी.
🔅 प्रवर्धित करण्याचा -
वरील सारे भारतात निर्माण करण्याचा. . .
🔅 संकल्पपुर्वक निर्धार-
मनामध्ये पक्का विचार करुन, ठेवून, मनात नक्की करुन. . .
आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान. . .
🔅 अंगीकृत -
भारतीय संविधान "स्वीकारून"
🔅 अधिनियमित -
या बाबतचा नियम, कायदा बनवुन
स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
आशा आहे, संविधान प्रास्ताविकाचे महत्व लक्षात आले असेल तर आता सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करु या.....!
जय संविधान👏👏
Thursday, 22 December 2022
गणितीय प्रश्नावली
गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजनयांच्या जयंती निमित्त
****************************
गणितीय प्रश्नावली ( 111 प्रश्न )
1) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- 9
-----------------------------------
2) दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- 10
---------------------------------
3) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- 99
---------------------------------
4) तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- 100
------------------------------
5) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- 999
------------------------------
6) चार अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- 1000
-----------------------------
7) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- 9999
----------------------------
8) पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- 10, 000
--------------------------
9) पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- 99, 999
----------------------------
10 ) 1 पासून 9 पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 9
----------------------------
11) 1 पासून 99 पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 90
----------------------------
12) 100 पासून 999 पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 900
----------------------------
13) 1000 पासून 9999 पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 9000
----------------------------
14) 10, 000 पासून 99, 999 पर्यंतच्या पाच अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 90, 000
---------------------------
15) 1 ते 10 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 55
-----------------------------
16) 11 ते 20 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर --- 155
------------------------------
17) 21 ते 30 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 255
---------------------------
18 ) 31 ते 40 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 355
------------------------------
19) 41 ते 50 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -' 455
-----------------------------
20) 51 ते 60 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 555
---------------------------
21) 61 ते 70 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 655
---------------------------
22) 71 ते 80 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 755
--------------------------
23) 81 ते 90 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 855
------------------------
24) 91 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 955
------------------------
25) 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 5050
--------------------------
26 ) 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत.
उत्तर -- 25
--------------------------
27) 1 ते 10 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 2, 3, 5, 7
--------------------------
28 ) 11 ते 20 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 11, 13, 17, 19
--------------------------------
29 ) 21 ते 30 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 23, 29
---------------------------------
30 ) 31 ते 40 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 31, 37
-------------------------------
31 ) 41 ते 50 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 41, 43, 47
------------------------------
32 ) 51 ते 60 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 53, 59
------------------------------
33 ) 61 ते 70 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 61, 67
--------------------------
34 ) 71 ते 80 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 71, 73, 79
--------------------------
35) 81 ते 90 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 83, 89
----------------------------
36) 91 ते 100 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 97
-----------------------------
37) 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 11 वेळ
------------------------------
38 ) 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक एककस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर- 10 वेळ
--------------------------
39) 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर- 1 वेळा
-------------------------
40) 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 21 वेळा
----------------------------
41) 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
----------------------------
42 ) 1 ते 100 पर्यंत 3 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
-----------------------------
43) 1 ते 100 पर्यंत 4 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
-----------------------------
44) 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
-----------------------------
45) 1 ते 100 पर्यंत 6 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
----------------------------
46) 1 ते 100 पर्यंत 7 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
----------------------------
47) 1 ते 100 पर्यंत 8 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
---------------------------
48) 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक एककस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
--------------------------
49 ) 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20
--------------------------
50) 1 ते 100 पर्यंत 3 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
-------------------------
51) 1 ते 100 पर्यंत 4 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
--------------------------
52 ) 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
-------------------------
53) 1 ते 100 पर्यंत 6 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
-------------------------
54) 1 ते 100 पर्यंत 7 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
---------------------
55) 1 ते 100 पर्यंत 8 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
--------------------------
56 ) 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक एकूण किती
वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
---------------------------
57 ) 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक दशकस्थानी किती
वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
-------------------------
58) 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक दशकस्थानी किती
वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
------------------------
59 ) 1 ते 100 पर्यंत 3 हा अंक दशकस्थानी किती
वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
------------------------
60 ) 1 ते 100 पर्यंत 4 हा अंक दशकस्थानी किती
वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
------------------------
61 ) 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक दशकस्थानी किती
वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
-------------------------
62) 1 ते 100 पर्यंत 6 हा अंक दशकस्थानी किती
वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
--------------------------
63) 1 ते 100 पर्यंत 7 हा अंक दशकस्थानी किती
वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
---------------------------
64 ) 1 ते 100 पर्यंत 8 हा अंक दशकस्थानी किती
वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
-------------------------
65 ) 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक दशकस्थानी किती
वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
-------------------------
66) 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक शतकस्थानी किती
वेळा येतो ?
उत्तर -- 1 वेळा
------------------------
67) दोन अंकी किती संख्या आहेत ?
उत्तर -- ९०
--------------------
68) मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ?
उत्तर -- सांगता येत नाही.
---------------------------
69) मोठ्यात मोठी पूर्ण संख्या कोणती ?
उत्तर -- सांगता येत नाही.
------------------------
70) लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती ?
उत्तर -- 1
-------------------------
71) सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
उत्तर -- 2
----------------------
72) सर्वात लहान विषम संख्या कोणती ?
उत्तर -- 3
----------------------
73) पहिल्या 10 सम संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 110
----------------------
74) पहिल्या 15 विषम संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 255
----------------------
75) सम असणारी एकमेव मूळ संख्या कोणती ?
उत्तर -- 2
----------------------
76) 1 मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- 60 सेकंद
----------------------
77) 1 तास म्हणजे किती मिनिट ?
उत्तर -- 60 मिनिटे
---------------------
78) 1 दिवस म्हणजे किती तास ?
उत्तर -- 24 तास
-----------------------
79) 1 आठवडा म्हणजे किती दिवस ?
उत्तर -- 7 दिवस
----------------------
80) 1 वर्ष म्हणजे किती दिवस ?
उत्तर -- 365 / 366 दिवस
----------------------
81) 1 वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर -- 12 महिने
--------------------
82) 1 तास म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- 3, 600 सेकंद
-----------------------
83 ) 1 दिवस म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- 86, 400 सेकंद
-------------------------
84 ) 1 लीटर म्हणजे किती मिलीलीटर ?
उत्तर -- 1000 मिलीलीटर
-----------------------
85) 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- 1000 ग्रेम
----------------------
86) 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर -- 100 सेंटीमीटर
-------------------------
87) 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- 1000 मीटर
---------------------------
88 ) 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- 100 किलोग्रॅम
--------------------------
89 ) 1 टन म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- 1000 किलोग्रॅम
-------------------------
90 ) 1 तोळा म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- 10 ग्रॅम
------------------
91 ) 1 डझन म्हणजे किती वस्तू / नग ?
उत्तर -- 12 वस्तू
---------------------
92 ) 1 ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- 12 डझन
----------------------
93) 1 दस्ता कागद म्हणजे किती कागद ?
उत्तर -- 24 कागद
------------------------
94 ) 1 रीम कागद म्हणजे किती दस्ते कागद ?
उत्तर -- 20 दस्ते
----------------------
95 ) 1 रीम कागद म्हणजे किती कागद ?
उत्तर -- 480 कागद
----------------------
96) 1 फूट म्हणजे किती इंच ?
उत्तर -- 12 इंच
-----------------
97) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
उत्तर -- तीन
---------------
98) त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- तीन
--------------
99) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
---------------
100) आयताला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
-----------------
101) चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
-----------------
102) चौरसाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
---------------------
103) इष्टिकाचितीला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- आठ
--------------------
104) आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे
काय ?
उत्तर -- आयताची परिमिती
------------------------
105) चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- चौरसाची परिमिती
------------------------
106) त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- त्रिकोणाची परिमिती
-------------------------
107) 12 तास = किती मिनिटे ?
उत्तर -- 720
----------------------------
108) 12 मिनिटे = किती सेकंद ?
उत्तर -- 720 सेकंद
-----------------------------
109) 12 तास = किती सेकंद ?
उत्तर -- 43, 200
---------------------------
110) 12 दिवस = किती मिनिटे ?
उत्तर -- 17, 280
-------------------------
111) 12 दिवस = किती सेकंद ?
उत्तर -- 10, 36, 800
संकलन
करूणा गावंडे, जांभुळकर



.jpeg)
%20(23).jpeg)
%20(22).jpeg)
%20(20).jpeg)
%20(21).jpeg)
%20(13).jpeg)
%20(14).jpeg)
%20(11).jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
%20(29).jpeg)
%20(5).jpeg)
.jpeg)