नाम व नामाचे प्रकार.Noun And Its Types.
नाम व नामाचे प्रकार.Noun And Its Types.
नाम :- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.
उदा. गाडी,पेन,टेबल,राग,सौंदर्य,साखर इत्यादी
नामाचे प्रकार
मराठीत नामाचे मुख्य ३ प्रकार पडतात.
१. सामान्यनाम
२. विशेषनाम
३. भाववाचक नाम
१. सामान्यनाम :-एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाम दिले जाते त्यास 'सामान्यनाम' असे म्हणतात.सामान्यनामाचे अनेकवचन होते.
उदा.शाळा,पाणी,ग्रह,तारा,माणूस इत्यादी
सामान्यनामाचे खालील दोन प्रकार पडतात.
अ.पदार्थवाचक नाम ब.समूहवाचक नाम
अ.पदार्थवाचक नाम:-जे घटक शक्यतो लिटर,मीटर किंवा कि. ग्रॅममध्ये मोजले जातात/संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला 'पदार्थवाचक नामे' असे म्हणतात.
उदा.सोने,कापड,मीठ,पाणी,प्लास्टिक,तांबे इत्यादी
ब.समूहवाचक नाम :- समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला'समूहवाचक नाम'असे म्हणतात.
उदा.ढिगारा,जुडी,गंज,मोळी इत्यादी
२. विशेषनाम :- ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा,वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास'विशेषनाम'असे म्हणतात.
विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते.
उदा. आशा,दिल्ली,गोदावरी,भारत,सूर्य इत्यादी
३. भाववाचक नाम :- ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण,धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला'भाववाचक नाम' असे म्हणतात.
उदा. आनंद,सौंदर्य,गुलामगिरी,विश्रांती,श्रीमंती,इत्यादी
भाववाचक नामाचे तीन गट पडतात.
अ.स्थितीदर्शक - जसे-गरिबी,हुशारी
ब. गुणदर्शक - जसे-सौंदर्य,प्रामाणिकपणा
क. कृतिदर्शक - जसे-चोरी,चळवळ
संकलन
करूणा गावंडे, जांभुळकर
No comments:
Post a Comment