वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Friday, 26 May 2023

विशेषण व विशेषणाचे प्रकार

 विशेषण व विशेषणाचे प्रकार पाहण्यासाठी खालील online ला क्लिक करा


                              Online

                  करूणा गावंडे, जांभुलकर



क्रियापद व त्याचे प्रकार

 

         क्रियापद व त्याचे प्रकार पाहण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा



 


सर्वनाम व त्याचे प्रकार

 

सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार.Sarvanam V Tyache Prakar.

 सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार.Sarvanam V Tyache Prakar.

सर्वनाम :- नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणार्‍या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात किंवा नामाऐवजी वापरल्या जाणार्‍या शब्दाला सर्वनामअसे म्हणतात.

जसे :- मी,तो,ती,ते,त्यांनी,त्यांना,आम्हाला,तुम्हाला इत्यादी

सर्वनामाचे प्रकार

सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात.

(1)पुरुषवाचक सर्वनाम

(2)दर्शक सर्वनाम

(3) संबंधी सर्वनाम

(4)प्रश्नार्थक सर्वनाम

(5)सामान्य अथवा अनिश्चित सर्वनाम

(6)आत्मवाचाक सर्वनाम


(1)पुरुषवाचक सर्वनाम :- जे सर्वनाम प्रथम पुरुषी ,द्वितीय पुरुषी,तृतीय पुरुषीचे दिग्दर्शन करते त्याला पुरुषवाचक सर्वनामअसे म्हणतात.प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत फक्त तृतीय पुरुषी सर्वनामे मात्र बदलतात.

उदा.मी,तो,ते,तू,तो,तुम्ही,आम्ही,त्या,ती इत्यादी

जगात बोलणारा,ऐकणारा व ज्याच्याविषयी बोलण्यात येते तो तिसरा असे तिघेच असतात. म्हणून भाषणातही तीन पुरुष असतात.

(अ).प्रथम पुरुषवाचक :- मी,आम्ही,स्वत:,आपण

उदा.(1) मी उद्या गावाला जाणार आहे.(2)आम्ही तुला मदत करु.

(आ).द्वितीय पुरुषवाचक :- तू ,तुम्ही,स्वत:,आपण

उदा.(1) तुम्ही एवढे काम कराच.(2)आपण आत या .

(इ).तृतीय पुरुषवाचक :-तो,ती,ते,त्या,हा,ही,हे,ह्या इत्यादी

उदा. (1)ती अतिशय सुंदर होती.(2)तो आजारी होता.


(2)   दर्शक सर्वनाम :-अगोदर माहीत असलेली जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरण्यात येते त्यास दर्शक सर्वनामअसे म्हणतात.दर्शक सर्वनाम होण्यासाठी (हा,ही,हे,तो,ती,ते)कर्ता म्हणून वापरावे लागतात.

उदा.हा,ही,हे,तो,ती,ते

(1) ही कोण आहे.

(2)ती चलाख आहे.

(3)हा रानटी हत्ती आहे.

जवळच्या वस्तूबद्दल हा,ही,हे वापरले जातात तर लांबच्या वस्तूबद्दल तो,ती,ते वापरतात.


(3) संबंधी सर्वनाम :-वाक्यामध्ये दोन गोष्टीमधील संबंध स्पष्ट करणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनामअसे म्हणतात.संबंधी सर्वनामांना अनुसंबंधी सर्वनामे असे सुद्धा म्हणतात.

उदा.जो,जी,जे,ज्या

(1)जो चढतो,तोच पडतो .

(2)जे चकाकते ,ते सोने नसते.

(3)जो करेल,तो भरेल.


(4)प्रश्नार्थक सर्वनाम :- ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात किंवा एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला ‘प्रश्नार्थक सर्वनाम’ असे  म्हणतात.

उदा.कोण,काय,कित्येक,कोणास,कोणाला,कोणी इत्यादी

(1) तुला काय पाहिजे ?

(2)कोणी रामायण लिहिले ?


(5)सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम :-वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले हे जेव्हा निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यास अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात.

उदा.(1) कोणी ,कोणास काय म्हणावे !

   (2)हल्ली कोण कोणाला विचारत नाही.

   (3)माझ्या मुठीत काय ते सांग पाहू !

   (4) कोणी कोणास हसू नये.


(6)आत्मवाचक सर्वनाम :- स्वतःविषयी उल्लेख करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.

उदा. (1)मी स्वत: त्याला पहिले.

    (2)आपण खेळायला जाऊ.

वरील वाक्यात स्वत:,आपण ही दोन्ही आत्मवाचक सर्वनामे आहेत.

     संकलन
करूणा गावंडे, जांभुळकर

 

नाम व नामाचे प्रकार

     


नाम व नामाचे प्रकार.Noun And Its Types.

 नाम व नामाचे प्रकार.Noun And Its Types.

नाम :- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.

उदा. गाडी,पेन,टेबल,राग,सौंदर्य,साखर इत्यादी  

नामाचे प्रकार

मराठीत नामाचे मुख्य ३ प्रकार पडतात.

१. सामान्यनाम 

२. विशेषनाम 

३. भाववाचक नाम

१. सामान्यनाम :-एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाम दिले जाते त्यास 'सामान्यनाम' असे म्हणतात.सामान्यनामाचे अनेकवचन होते.

उदा.शाळा,पाणी,ग्रह,तारा,माणूस इत्यादी

सामान्यनामाचे खालील दोन प्रकार पडतात. 

अ.पदार्थवाचक नाम    ब.समूहवाचक नाम

अ.पदार्थवाचक नाम:-जे घटक शक्यतो लिटर,मीटर किंवा कि. ग्रॅममध्ये मोजले जातात/संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला 'पदार्थवाचक नामे' असे म्हणतात.

उदा.सोने,कापड,मीठ,पाणी,प्लास्टिक,तांबे इत्यादी

ब.समूहवाचक नाम :- समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला'समूहवाचक नाम'असे म्हणतात.

उदा.ढिगारा,जुडी,गंज,मोळी इत्यादी

२. विशेषनाम :- ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा,वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास'विशेषनाम'असे म्हणतात.

विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते.

उदा. आशा,दिल्ली,गोदावरी,भारत,सूर्य इत्यादी

३. भाववाचक नाम :- ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण,धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला'भाववाचक नाम' असे म्हणतात.

उदा. आनंद,सौंदर्य,गुलामगिरी,विश्रांती,श्रीमंती,इत्यादी

भाववाचक नामाचे तीन गट पडतात.

अ.स्थितीदर्शक  - जसे-गरिबी,हुशारी 

ब. गुणदर्शक - जसे-सौंदर्य,प्रामाणिकपणा 

क. कृतिदर्शक - जसे-चोरी,चळवळ




 संकलन
करूणा गावंडे, जांभुळकर