वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Friday 6 December 2019

डॉ.आंबेडकरांचे ई साहित्य


आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ई साहित्य त्यांच्या हिंदी खंड च्या रुपात वाचण्यासाठी खालील शब्दावर क्लीक करा..


खंड १

खंड -२

खंड -३

खंड -४

खंड -५

खंड -६

खंड -७

संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
चंद्रपूर

Saturday 2 November 2019

संगीतमय परिपाठ




वर्षभर घ्यावयाचे संगीतमय परिपाठ आर्डर सहित 52 परिपाठ (आडियो स्वरूपात) वेगवेगळ्या प्रार्थना व समूहगीता सह विद्यार्थ्यांना ऐकवण्यासाठी खालील इमेज ला क्लीक करा.


संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा ,चंद्रपूर

Friday 25 October 2019

ISM V6 सॉफ्टवेअर द्वारे कॉम्प्युटर वर मराठी टायपिंग करणे

*    


VAVHALESIR_4U*        *98-33-11-77-44*
*92-7070_3535*

    *संपूर्ण ISM V6*

*मित्रांनो, कॉम्प्युटर वर मराठी टायपिंग कसे करावे याविषयी बऱ्याच वेळा चर्चा होते.अनेक जण अनेक पर्याय सुचवतात पण आज आपण सर्व शासकीय कार्यालयात मराठी टायपिंग करण्यासाठी जे युनिकोड सॉफ्टवेअर वापरले  जाते म्हणजेच*
*ISM V6 (Updated Version)*
*जे अतीशय सोपे आहे त्याची इत्यंभूत माहिती पाहू.*

*ISM युनिकोड टायपिंग ची वैशिष्ट्ये*

*1) इग्रजी अक्षरांवर मराठी टायपिंग होते. जे हवेत तेच शब्द टाईप होतात शब्द सिलेक्षन  करावे लागत नाहीत उदा. राम r +(shift key दाबून) a + m + a*

*2) खूप युनिकोड फॉन्ट आहेत त्यामुळे आपल्याला हवा तो युनिकोड फॉण्ट वापरून डॉक्युमेंट सुंदर बनवता येतात.ही सुविधा गुगल इनपुट मध्ये नाही.शक्य झाले तरी खूप समस्या येतात.*
*3) सर्व शासकीय कार्यालयात bellingual format वापरतात त्यामुळे ते सर्व डॉक्युमेंट आपण आपल्या संगणकावर पाहू शकतो गुगल इनपुट मध्ये ते शक्य नाही.*

*चला तर पाहूया*
*ISM V6 Unicod Software*

*Install कसे करावे?*

*1) खालील लिंक ला क्लिक करून माझ्या गुगल ड्राईव्ह वरून हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या व तुमच्या संगणकाच्या C  ड्राईव्ह सोडून इतर कुठल्याही ड्राईव्ह का कॉपी–पेस्ट करून घ्या.*

https://drive.google.com/folderview?id=11GYJDeTVUQMlWY2qFMAteJmbx0rLT2II

*2) फाईल ओपन करा व त्यातील*
*Setup............application*
*ला right click 2 वेळा करा*
*पुढील मॅसेज येईल*

*_Please close all open application before installation_*
*त्याखाली  OK बटाणाला क्लिक करा*

*3) application installation सुरू होईल वाट पाहा*

*4)आता पुढील विंडो येईल*
*_Welcome to install shield wizard for ISM V6_*
*Next बटण का क्लीक करा*

*5)आता पुढील विंडो येईल*
*_Licence Agreement_*
*Yes बटण ल क्लिक करा*

*6)आता पुढील विंडो येईल*
*_Customar Information_*

*Comany name मध्ये Home असे लिहा व next बटण ला क्लीक करा*

*7)आता पुढील विंडो येईल*

*_Choose Destination location_*
*next बटण ला क्लीक करा*
*8) आता ISM V6 चा*
*_Components_*

*विंडो येईल व ISM V6 चे installation सुरू होईल.*

*सर्व installailation प्रक्रिया पूर्ण होवून*

*_ISM V6 Installation successful_*

*हा विंडो येईल OK करा*

*9) आता README Notepad हा विंडो येईल. वर उजव्या कोपऱ्यात × (cancel) बटनावर क्लिक करा*

*10) आता Registration Form येईल. नेट चालू करून विचारलेली सर्व माहिती भरा व Submeet करा किंवा माहिती न भरता डायरेक्ट  Cancel बटण वर क्लिक करा.जे आवडेल ते करा.*

*11) आता पुढील विंडो मध्ये*
*_Installation shield wizard complete_*
*हे लिहून येईल व त्याखाली*
*๏ Yes I want to restart my computer*
*असा Yes च्या बटनावर अगोदरच टिक केलेला केलेला विंडो येईल. टिक केलेले नसेल तर ते करा व खाली असलेल्या*
*_Finish_*
*बटण का क्लिक करा*

*12)आता तुमचा कम्प्युटर Restart होईल.ISM softwar तुमच्या कॉम्प्युटर वर install झाले आहे.*

*13) तुमच्या संगणकाच्या Desktop वर ISM Software चे ' ' i ' अक्षर असलेले सिम्बॉल आलेले असेल.right double click करून तो pin to taskbar ला left double click करून तो taskbar ला घ्या.*

*14) Taskbar वर असलेल्या ISM-Symbol ला Left double Click करा. टायपिंग चे सर्व Menu ओपन होतील.*
*कर्सर Easy Phonetic Window ला नेवुन left singal click करा यामुळे आपण जसे बोलतो तीच इंग्रजी अक्षरे टाईप करून सहज मराठी टायपिंग करता येईल*
*आता कर्सर Num Lock या विंडो वर नेवून left singal click करा.यामुळे num lock की दाबल्यावर आपण इंग्रजी व मराठी टायपिंग दोन्ही एकाच वेळेस करू शकतो. Ism टायपिंग करताना Num lock on असणे आवश्यक आहे*
*15) ISM मध्ये टायपिंग करताना ISM Software चालू असणे आवश्यक आहे त्यामुळे नेहेमी ISM MENU चालू करून minimise करा व टायपिंग करा.*
*16) आता एखादी Word किंवा Excel ची फाईल ओपन करा. Font Selection मध्ये जा व*
*_DOVT Surekh_*
*_DOVT Yogesh_*
*_DOVT Ganesh_*
*व मराठी अंकासाठी*
*वरील Font पुढे MR असलेला Font निवडा*
*फॉण्ट फाईल मध्ये 100 च्या वर अशाच प्रकारचे खूप सुंदर Font आहेत तेही download करून घ्या*
*Font File Link*

https://drive.google.com/folderview?id=1CRtq7hqwunNyImSy_h4OYGJxHDPF9LDp

*सर्व फॉन्ट एकत्रित कॉपी पेस्ट कसे करावेत?*
*1) फाईल डाऊनलोड करून घ्या.*
*2) तुमचा PC मध्ये ती फाईल कॉपी पेस्ट करा*
*3) फाईल open करा*
*4) control + A दाबा[ सर्व फॉन्ट आकाशी रंगाने सिलेक्ट होतील ]*
*5) mouse ने cursor सिलेक्ट केलेल्या फॉन्ट च्या मध्ये नेवून control + C दाबा [ select केलेले सर्व फॉन्ट कॉपी होतील ]*
*6) PC च्या स्टार्ट मेनू मध्ये Font असे टाइप करुन font - file शोधा-लगेच दिसेल.*
*7) Font file open करा व ओपन झालेल्या application वर cursor ने एकदा क्लिक करून.*
*control + P दाबा म्हणणे सर्व फॉन्ट कॉपी होतील.*

🖥🖥🖥🖥🖥🖥

*17) टाईप कसे करावे ?*
*प्रत्येक इंग्रजी की वर त्याच उच्चाराची मराठी अक्षरे आहेत.त्यानुसार आपण सहज टायपिंग करू शकतो*

*Key व अक्षरे*

*A = अ*
*AA किंवा shift A = आ*
*I = इ*
*II किंवा shift I = ई*
*U = उ*
*UU किंवा shift U = ऊ*
*E = ए*
*AI = एे*
*O = ओ*
*Shift O = ऑ*
*Shift + 2 किंवा 3 + A = अॅ*
*AU = औ*
*AM =अं*
*AH = अ:*

*अपेक्षित अक्षरांना काना, मात्रा, वेलांटी, उकार देण्यासाठी त्या अक्षर पुढे दिलेली स्वर-की दाबावी*
*उदा.*
*K + A = क*
*K + AA किंवा shift A = का*
*K + I = कि*
*K + II किंवा shift I = की*
*K + U = कु*
*K + UU किंवा shift U = कू*
*K + E = के*
*K + A + I = कै*
*K + O = को*
*K + A + U = कौ*
*K + Shift + 2 किंवा 3  = कॅ*
*K + Shift O = कॉ*
*K + shift + M = कं*
*K + H = कः*
*KA = क*
*KH = ख*
*GA = ग*
*GHA = घ*
*CA = च*
*CH किंवा shift + CA = छ*
*JA = ज*
*JHA किंवा ZA = झ*
*shift + TA =  ट*
*shift + T + HA = ठ*
*shift + DA = ड*
*shift + D + HA = ढ*
*shift + N = ण*
*TA = त*
*THA = थ*
*DA = द*
*DHA = ध*
*NA = न*
 *PA - प*
*PHA किंवा shift + P +A =  फ*
*BA = ब*
*BHA किंवा B + shift + A = भ*
*MA = म*
*YA = य*
*RA = र*
*LA = ल*
*VA किंवा WA =  व*
*SHA = श*
*shift +S+A = ष*
*SA = स*
*HA - ह*
*shift + L = ळ*

*_यापुढील नंबर 'की' या मुख्य कीबोर्ड वरील आहेत_*

*KSH किंवा shift + 7 + A = क्ष*

*DNYA किंवा shift + 5 + A =  ज्ञ*

*TRA किंवा shift + 6 + A = त्र*

*SHRA किंवा shift + 8 + A = श्र*

*shift + [+] =  ऋ*

*अक्षर + Shift + [+] = ृ (उदा. P + shift + [+] = पृ*

*अक्षर + shift + M = अनुस्वार ं [उदा. P + shift + M = पं ]*

*अक्षर + shift + X = अर्धे अक्षर [उदा. P + shift + X =  प् ]*

*R + अक्षर + A = रफार [उदा. R + P + A = र्प ]*

*अर्धा 'र' __'य' ला जोडताना  अगोदर पूर्ण विराम ची की दाबून . नंतर R ची की व नंतर Y ची की व नंतर A ची की दाबावी ऱ्य*
*इतर अक्षरांना जोडताना*
*अक्षर + R + A =' र' चा जोडशब्द तयार होतो*
*उदा.*
*P + R + A = प्र*

*याच माहितीची pdf फाईल मिळवण्यासाठी खालील लिंक का क्लिक करून डाऊनलोड करा.*


https://drive.google.com/folderview?id=1e8S8zVxKETNKn0aNFU3bpI6bwVyrbnWo


*प्रवीण वाव्हळे सर*
*सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा*
*उल्हासनगर*
*जिल्हा - ठाणे*
*92-7070-3535*
*98-33-11-77-44*

Monday 12 August 2019

आकारिक चाचणी 1 -20019-20

        सत्र 2019-20 आकारिक चाचणी -1 च्या इयत्ता 1 ते 8 च्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील वर्गावर क्लीक करा.

                  वर्ग 1 ला

                 वर्ग 2 रा






संकलन 
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका चंद्रपूर

Friday 19 July 2019

सूत्रसंचालन चारोळ्या

सूत्रसंचालन चारोळ्या



सूत्रसंचालन चारोळ्या संग्रह 

          आदर्श  परिपाठ संचलन*     

            
        *राष्ट्रगीत*
           सावधान, विश्राम
सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी
  आणि भारताचा भाग्यविधाता
  अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा
  गाऊनी राष्ट्रगीता,गाऊनी राष्ट्रगीता
                सावधान
   एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे
                शुरू कर.

    *राष्ट्रवंदना*
  राष्ट्र माझी माता राष्ट्र माझा पिता
  राष्ट्र गुरू आणि राष्ट्र माझा दाता
        या राष्ट्रा करूया वंदन
    तोडूनी साऱ्या धर्मांचे बंधन
  एकसाथ राष्ट्रवंदना शुरू करेंगे
     शुरू कर

      *प्रतिज्ञा*
        देशा विषयी प्रेम
          मोठ्यां विषयी आदर     
         करून घेऊ बंधुभाव
           व कर्तव्याची जान
          उजळू सर्वांची प्रज्ञा
      घेऊन प्रतिज्ञा,घेऊन प्रतिज्ञा
      एकसाथ प्रतिज्ञा शुरू करेंगे
                    शुरू कर


              *संविधान* 
लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
      घेऊनी भारताचे संविधान
      घेऊनी भारताचे संविधान
    एकसाथ संविधान शुरू करेंगे
                शुरू कर

         *स्वच्छतेची प्रतिज्ञा*
        तन-मनास देण्यास आज्ञा
     घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा   
       एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा   
           शुरू करेंगे शुरू कर


*एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ*

              *प्रार्थना गीत*
     साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
         त्यांचे रचित गाऊया गान
         त्यांचे रचित गाऊया गान
      एकसाथ खरा तो एकची धर्म
             शुरू करेंगे शुरू कर       

             *स्फूर्ती गीत*
          राह पे चलते वक्त   
         मुसिबते तो आयेगी
        स्फुर्तीगीतोंसे वों कंही
         दूर भाग जायेगी
  एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे
             शुरू कर

            *सुविचार*
लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
      घेऊनी भारताचे संविधान
      घेऊनी भारताचे संविधान
    एकसाथ संविधान शुरू करेंगे
                शुरू कर

         *स्वच्छतेची प्रतिज्ञा*
        तन-मनास देण्यास आज्ञा
     घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा   
       एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा   
           शुरू करेंगे शुरू कर


*एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ*

              *प्रार्थना गीत*
     साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
         त्यांचे रचित गाऊया गान
         त्यांचे रचित गाऊया गान
      एकसाथ खरा तो एकची धर्म
             शुरू करेंगे शुरू कर       

             *स्फूर्ती गीत*
          राह पे चलते वक्त   
         मुसिबते तो आयेगी
        स्फुर्तीगीतोंसे वों कंही
         दूर भाग जायेगी
  एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे
             शुरू कर

            *सुविचार*
     लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
      घेऊनी भारताचे संविधान
      घेऊनी भारताचे संविधान
    एकसाथ संविधान शुरू करेंगे
                शुरू कर

         *स्वच्छतेची प्रतिज्ञा*
        तन-मनास देण्यास आज्ञा
     घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा   
       एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा   
           शुरू करेंगे शुरू कर


*एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ*

              *प्रार्थना गीत*
     साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
         त्यांचे रचित गाऊया गान
         त्यांचे रचित गाऊया गान
      एकसाथ खरा तो एकची धर्म
             शुरू करेंगे शुरू कर       

             *स्फूर्ती गीत*
          राह पे चलते वक्त   
         मुसिबते तो आयेगी
        स्फुर्तीगीतोंसे वों कंही
         दूर भाग जायेगी
  एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे
             शुरू कर

            *सुविचार*
    सांगून सर्वांना थोरांचे विचार
     रुजवू विचारातून संस्कार
  सांगून सुविचार,सांगून सुविचार
 सुविचार सांगण्यासाठी येत आहे
             *--------------*

            *दिनविशेष*
    कधी सोनेरी, कधी काळा
        दिवस असतो विशेष  
         *---------------*
           घेऊन येत आहे   
        आजचा दिनविशेष

             *बातम्या*
      काय घडले जगात           
      काय घडले देशात
         जाणून घेऊया
      आजच्या बातम्यात
बातम्या सांगण्यासाठी येत आहे
            *-------------*

         *सामान्य ज्ञान*
  सागरा समान विस्तृत ज्ञाना
     थेंब थेंब मी वेचून घेतो
  सामान्य ज्ञानातून मिञा
 मोती होवून चमकून जातो
 सामान्य ज्ञान सांगण्यासाठी
                येत आहे
           *--------------*

             *बोधकथा*
        संस्काराशी नाते जडे           
        बोधकथेतून घेऊ धडे
 बोधकथा सांगण्यासाठी येत आहे
            *------------------

            *पसायदान*
  समाज उद्धरण्या मागीतले दान
         ज्ञानेश्वरांचे पसायदान
  एकसाथ पसायदान शुरू करेंगे
              शुरू कर


👫  👫  👫 👫  👫  👫  👫
धन्यवाद....



*_...  परिपाठाचे सुत्रसंचलन  ...*_


सुस्वागतम्  सुस्वागतम् सुस्वागतम्


फुल फुलत आहे, कळी उमलत आहे .
अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे .

सागराला साथ असते पाण्याची
बागेला शोभा असते फुलांची
तसेच
आमच्या परिपाठाला साथ असते काही विद्यार्थ्याची ,


माझे नाव ..................... मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे.


सु म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन सुविचार सांगत आहे .................


आपल्याला वार , दिनांक , शके यांची माहिती असणे अवश्यक असते , म्हणुन आजचे पंचांग सांगत आहे ...................


आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे  ......................


आपल्याला ज्यातून बोध होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे ......................


उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते ,
अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो. तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते , म्हणून सामान्य ज्ञान घेत आहे ...................


प्रत्येक माहिती नवीन मुलगा सांगेन व त्याने त्याचे सांगितलेले काम केले की सुत्रसंचलन करणारा विद्यार्थी त्याचे नाव घेऊन धन्यवाद करीन.


वरील प्रमाणे आम्ही आमच्या शाळेचा परिपाठ घेतो.


इ.२ री चे लहान विद्यार्थी सुद्धा आता सुत्रसंचलन पाठ करुन पारिपाठ घेण्याचा प्रयत्न करत आहे.



चारोळ्या 

☄☄ *दिपप्रज्वलन* ☄☄

अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण ---- (2)

एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.

जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.

संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची

  🇮🇳☄ *प्रास्ताविक* ☄🇮🇳

गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.

प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान

जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून

 🇮🇳☄ *मार्गदर्शन* ☄🇮🇳

तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----

ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा

बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन

 🇮🇳☄ *आभार* 🇮🇳☄

कार्यक्रम झाला बहारदार
भाशणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार

प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.

थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.

व्संतात येतो फुलांना बहार
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार

*संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका चंद्रपूर*

Thursday 11 July 2019

वृक्षारोपणाचे महत्व व घोषवाक्ये


महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी  वृक्षलागवडीसाठी महत्वाची  माहिती पाहण्यासाठी  खालील शब्दावर क्लीक करा



संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका ,राजुरा चंद्रपूर

Tuesday 28 May 2019

मराठी व इंग्रजी बोधकथा


विद्यार्थ्यांना सदैव  बोध मिळेल  अशा सुंदर अशा बोधकथा मराठी व इंग्रजी मध्ये पाहण्यासाठी खालील शब्दाला क्लीक करा


बोधकथा


संकलन करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा ,चंद्रपूर

Wednesday 8 May 2019

मराठी शाब्दिक कोडी व भाषिक खेळ


बुद्धीला खुराक देणारे भाषिक कोडी पाहण्यासाठी खालील  शब्दाला क्लीक करा.

भाषिक कोडी


शाब्दिक कोडी

--------------------------------------------------

विविध भाषिक खेळ मुलांना सांगण्यासाठी जरूर पहा..
भाषिक खेळ

१)-
समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.
हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल.
खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत
यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा
की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल
.
उदा.-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते.
झोपडी म्हणजे घर व
दरवाजा म्हणजे दार.


1.फायदा+नुकसान
2.वडील+मुलगा
3.विवाह+काम
4.दिनांक+दिवस
5.शरीर+शिक्षा
7.राहणे+घर
याप्रकारे शब्दांच्या जोडया देऊन खेळ घेता
येतो.


उत्तरे-1.नफातोटा
2.बापलेक
3.लग्नकार्य
4.तारीखवार
5.देहदंड
6.वसतिगृह.


२)
खाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे, सगळी उत्तरे एका शब्दात आणि मराठीमध्ये असावीत …. पण त्या
शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी असू
नये.. अवधि – 1तास


उदाहरणार्थ :
मुलाचे नाव – मदन
1. गावाच नाव - फलटण
2. मुलीचं नाव - पलक
3. आडनाव - करमरकर
4. धातू - कनक
5. फूल - कमळ
6. फळ - फणस
7. झाड - वड, पळस
8. गोड पदार्थ - खरवसाचा
9. वस्तू - कढई
10. पूजा साहित्य - तबक
11. दागिना - नथ
12. हत्यार - करवत
13. पक्षी - बदक
14. प्राणी - अस्वल, मगर
15. नदी - सतेज

3.
उद्देश :- शब्दातील परस्परसंबंध जाणून
              त्यांना क्रमाने लावणे.


■ सूचना :- हा खेळ दोन गटांत खेेेळता येेेतो
             
(१) झाड  - कळी   -  फूल   - फळ.
(२) फूल  -  मधमाशी - पोळे  - मध.
(३) बीज   - अंकुर   - रोप   -  झाड.
(४) कापूस - सूत   -  कापड  - वस्त्र.
(५) बांबू   -  लगदा   - कारखाना - कागद.


(६) दूध   -  दही     -  लोणी   -  तूप.
(७) झाड   - चिक   - रबर   -  चेंडू.
(८) सुरवंट  - कोश  - रेशीम  - कापड.
(९) समुद्र  - वाफ   - ढग  -  पाऊस
(१०) भुईमूग   - शेंगदाणे  - घाणा  - तेल


संकलन- करुणा गावंडे ,जांभुलकर
चंद्रपूर

Sunday 28 April 2019

महाराष्ट्र दिन -१ मे पार्श्वभूमी व इतिहास


महाराष्ट्र दिन १ मे 
पार्श्वभूमी व इतिहास जाणून घेण्यासाठी खालील DOWNLOAD वर क्लिक करा

महाराष्ट्र दिन सामान्य माहिती


महाराष्ट्र दिनाचा इतिहास


महाराष्ट्र दिन सूत्रसंचालन

DOWNLOAD

संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
चंद्रपूर

Friday 26 April 2019

संकलित गुणदान तक्ते इयत्ता 1 ते 8

इयत्ता 1 ली ते 8 वि चे विषयवार गुणदान तक्ते
पाहण्यासाठी खालील इमेज ला क्लीक करा



संकलन
करुणा गावंडे ,चंद्रपूर


Thursday 11 April 2019

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय , विचार सूत्रसंचालन


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्याविषयी बरच काही...
खालील शब्दावर क्लीक करून माहिती मिळवा

त्यांचा जीवन परिचय

निबंध/भाषण

त्यांचे विचार

भीमजयंती सूत्रसंचालन

डॉ.आंबेडकरांचे प्रेरणादायी सुविचार

संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
विषय शिक्षिका
राजुरा ,चंद्रपूर

Monday 8 April 2019

जागतिक महिला दिन- चारोळी व काव्य


जागतिक महिलादिनानिमित्त "आजची स्त्री" यावर महाराष्ट्रातील नामवंत शिक्षिकेच्या (only super Active शिक्षिका समूहातील शिक्षिकेच्या) लेखणीतून साकार झालेल्या चारोळ्या वाचण्यासाठी खलील download ला क्लीक करा


"स्त्री महिमा" यावर काव्य,कविता वाचण्यासाठी खलील download ला क्लीक करा


DOWNLOAD


संकलन
करुणा गावंडे ,जांभुलकर
समूह प्रशासक
Only super Active शिक्षिका समूह 

Monday 18 March 2019

संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका- 2018 -19

संकलित चाचणी क्र 2
इयत्ता 1 ते 8 च्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील इयत्तेवर क्लीक करा.


इयत्ता १ली


इयत्ता २ री


इयत्ता ३ री


इयत्ता ४ थी



यत्ता ६  वि मराठी


इयत्ता ६ वि गणित


इयत्ता ६ वि हिंदी


इयत्ता ६ वि विज्ञान


इयत्ता ६ वि  इंग्रजी


इयत्ता ७ वी सर्व विषय


इयत्ता 7 वी इंग्रजी


इयत्ता ८ वी सर्व विषय



इयत्ता १ली ते ८ वी कला ,कार्यां व शारीरिक शिक्षण उपक्रम व प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खालील click here ला टच करा.




संकलन
करुणा गावंडे जांभुलकर
विषय शिक्षिका ,चंद्रपूर