वर्णनात्मक नोंदी

माझे शैक्षणिक कार्य

माझे शैक्षणिक कार्य:- 1) 2016 ला शाळेला आय एस ओ मानांकन मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. 2) नवरत्न स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना पोचविण्यात यश 3) 2014 -2015 ला शाळा 'ग्रामीण गुणवत्ता विकास ' कार्यक्रमात शाळा 'ब' श्रेणीत आणण्यात यश 4) 2015-2016 ला 'ग्रामीण गुणवता विकास ' कार्यक्रमात तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर 5) 'तंबाखू मुक्त शाळा ' करण्यात पुढाकार घेऊन प्रथम पारितोषिक मिळवले. 6) बाल आनंद मेळावे आयोजन 7) 'दप्तराविना शाळा' उपक्रमाचे आयोजन 8) हस्ताक्षर सुधार प्रकल्प ,दत्तक कुंडी प्रकल्प राबविण्यात यश 9) शाळेत परसबाग ,औषधी वनस्पती उद्यान,व आक्सिजन पार्क ची निर्मिती. 10) विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत विद्यार्थी पोचविण्यात यश. 11) 'झुलती बाग' तयार निर्माण करून वृक्षप्रेम जागृती 12) उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थिती ध्वज /उपस्थिती कुंडी उपक्रम राबविले 13) विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे वाढदिवस 14) 'विद्यार्थी हस्तपुस्तिका' निर्मिती 15) स्वच्छ मुलगा/मुलगी उपक्रम 16) विद्यार्थ्यची स्पर्धा परीक्षा तयारी करण्याच्या दृष्टीने बौद्धिक कोडे व प्रशमंजुषा स्पर्धा आयोजन 17)2016 ला 'नवचेतना शाळा' करण्यात योगदान.करूणा गावंडे प्रशासक प्रमुख,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह.

माझे गायन

माझे सामाजिक कार्य

सामाजिक कार्य :- 1) किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन वर्ग 2) 'माता पालक प्रबोधन' मेळाव्याचे आयोजन 3) लोकसहभागातून शाळेत सभामंडप व फर्निचर खरेदी 4)शैक्षणिक संस्थांना महापुरुषांच्या प्रतिमांची भेट. 5) सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची भेट 6) 'लेक शिकवा अभियान' यशस्वी करण्यात योगदान 7) पर्यावरण जागृती साठी विविध उपक्रम.. करूणा गावंडे, जांभुलकर. प्रशासक प्रमुख, महाराष्ट्र ई लर्निंग समूह व प्रशासक प्रमुख, राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह

Sunday, 26 February 2023

मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी

 



मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध माहिती पाहण्यासाठी खालील online  ला क्लिक करा..

मराठी भाषा दिन इतिहास

Online


मराठी भाषा दिन संपूर्ण माहिती

Online


मराठी भाषा दिन घोषवाक्ये

Online


मराठी भाषा दिन रांगोळी

Online






मराठी भाषा दिन फलक लेखन

Online








मराठी भाषा गौरव दिनानिमित्त

*'र ' ची करामत( ' र ' ची  साखळी)*


(१)पाण्यात राहणारे प्राणी -- जलचर 

(२)लिहिता , वाचता येणारा-- साक्षर 

(३)लिहिता - वाचता न येणारा - निरक्षर 

(४)बातमी आणून देणारा -- वार्ताहर 

(४)वनात राहणारे प्राणी -- वनचर 

(५)जमिनीवर राहणारे -- भूचर 

(६)धान्य साठवण्याची जागा -- कोठार 

(७)जमिनीखालून गेलेला रस्ता -- भुयार 

(८)कथा(गोष्ट ) लिहिणारा -- कथाकार 

(९)दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार 

(१०)जादूचे खेळ करून दाखवणारा -- जादूगार 

(११)नाटक लिहिणारा -- नाटककार 

(१२)चित्रे काढणारा -- चित्रकार 

(१३)खूप दानधर्म करणारा  -- दानशूर 

(१४)शत्रूला सामील झालेला  -- फितूर 

(१५)शत्रूकडील बातम्या काढणारा -- हेर 

(१६)भारताचा राष्ट्रीय पक्षी -- मोर 

(१७ )एक पाळीव प्राणी -- मांजर 

(१८)पाण्यातील एक प्राणी -- मगर 

(१९)झाडावर सरसर चढणारा प्राणी -- खार 

(२०)सरपटणारा एक  प्राणी  -- अजगर 

(२१)मसाल्याचा एक पदार्थ  -- केशर 

(२२)मोराची मादी  --    लांडोर 

(२३)मीठ तयार करतात ते ठिकाण - मिठागर

(२४)लोखंडी वस्तू तयार करणारा -   लोहार 

(२५)सोन्या -चांदीचे दागिने बनवणारा - सोनार 

(२६)मातीची मडकी बनवणारा --  कुंभार 

(२७)आजारी लोकांना औषधे देणारा -  डाॅक्टर 

(२८)लाकडी वस्तू तयार करणारा --  सुतार  

(२९)चामड्याच्या चपला बनवणारा - चांभार 

(३०)केळ्यांचा (घड) समूह -- लोंगर 

(३१)महाराष्ट्राची उपराजधानी - नागपूर 

(३२)एक कडधान्य -- मसूर 

(३३)एक बी असणारे एक फळ --  बोर 

(३४)एक शेंग भाजी  --  गवार 

(३५)या वनस्पतीपासून कात काढतात -- खैर 

(३६)हातमागावर कापड विणणारा   -- विणकर 

(३७)एक गोड पदार्थ  -- साखर 

(३८)खा-या पाण्याचा मोठा साठा -- महासागर 

(३९)लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक - मीटर 

(४०)पाण्याचा एक स्त्रोत  -- विहीर

=======================


संकलन

करूणा गावंडे, जांभुळकर

विषय शिक्षिका आर्वी

राजुरा,चंद्रपूर